
फ्युचर जनराली इंडिया इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडने सामाजिक योगदान देण्यासाठी वंचित सामाजिक घटकांमधील मुलांमध्ये साक्षरतेचे प्रमाण वाढवण्यासाठी आणि लॉकडाऊनमध्ये त्यांच्यात वाचनाची आवड रुजवण्यासाठी ‘रूम टू रीड’ या एनजीओशी करार केला आहे. या भागीदारीच्या माध्यमातून कंपनी महाराष्ट्रातील 12 शाळांपर्यंत पोहोचली आणि पहिली ते पाचवी या इयत्तांमधील मुलांना 3089 साक्षरता संचांचे वाटप केले. या संचांमध्ये गोष्टीची पुस्तके, लेखन स्वाध्याय वह्या, लेखन साहित्य आणि ऑक्टिव्हिटी कार्डस्चा समावेश होता.

























































