
महिनाभर ओढ लावणारा पाऊस गेल्या चार दिवसांपासून मुंबईसह तलाव क्षेत्रात जोरदार बरसू लागल्याने पाणीसाठा चांगलाच वाढू लागला आहे. तलाव क्षेत्रात एकाच दिवसांत 1,28,093 दशलक्ष लिटर पाऊस पडला असून हे पाणी 33 दिवसांना पुरणारे आहे. दरम्यान, सात तलावांत सद्यस्थितीत 4,15,175 दशलक्ष लिटर पाणी असून हे पाणी पुढील 109 दिवसांना म्हणजेच ऑक्टोबर अखेरपर्यंत पुरणारे आहे.
असा आहे तलावांतील पाणीसाठा
- मोडक सागर – 66,092 दशलक्ष लिटर
- तानसा – 78,467 दशलक्ष लिटर
- मध्य वैतरणा – 37,551 दशलक्ष लिटर
- भातसा – 1,97,321 दशलक्ष लिटर
- विहार – 27,698 दशलक्ष लिटर
- तुळशी – 8,046 दशलक्ष लिटर
मुंबईला सात तलावांतून दररोज 3,800 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो.































































