
पेगासस स्पाइवेअरचा वापर करून करण्यात आलेल्या हेरगिरी प्रकरणात नवा खुलासा झाला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी, राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर आणि अन्य दोन केंद्रीय मंत्र्याचे फोन टॅप केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या मंत्र्यांमध्ये अश्विनी वैष्णव आणि प्रल्हाद पटेल यांचीही नावे समोर आली आहेत.
दरम्यान, इस्रायली कंपनी पेगासस सॉफ्टवेअरच्या मदतीने केल्या जाणाऱया फोन टॅपिंग प्रकरणावरून विरोधी पक्षांनी संसदेत जोरदार राडा केला. माजी केंद्रीय मंत्री आणि माहिती तंत्रज्ञान संसदीय स्थायी समितीचे सभापती शशी थरूर यांनी या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे. केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रकरणाचा हेरगिरीशी काहीही संबंध नाही. हे लोकशाहीला बदनाम करण्याचे षड्यंत्र असल्याचे म्हटले आहे.
























































