
व्हॉट्सऍपने नुकतंच एक नवीन फीचर आणले असून आता व्हिडीओ कॉल अजून सोपा आणि सुलभ होणार आहे. व्हॉट्सऍपने ग्रुप व्हिडीओ कॉलिंगसाठी Joinable call नावाचे फीचर आणले आहे. त्यामुळे एखादा व्हिडीओ कॉल युजरकडून सुटणार नाही.
व्हॉट्सऍपने नुकतंच Joinable call नावाचे फीचर आणले आहे. या फीचरनुसार युजर कधीही एखाद्या व्हिडीओ कॉलमध्ये सामील होऊ शकतो. तसेच मध्येच कॉल डिसकनेक्ट झाल्यास पुन्हा जॉईन होऊ शकतो. झूम मीटींग आणि गूगल मीट या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये अशा प्रकारचे फीचर आहे. याच्याशीच मिळते जुळते फीचर व्हॉट्सऍपने आणले आहे. वर्क फ्रॉम होममुळे व्हॉट्सऍपचा कामासाठी जास्त उपयोग वाढला आहे. त्यामुळेच कंपनीने हे नवे बदल केले आहेत.
सोमवारपासून हा नवा फीचर सुरू झाला आहे. ग्राहकांच्या मोबाईलमध्ये हे फीचर लवकरर दिसणार आहे. या फीचरनुसार समजा तुम्हाला ग्रुप कॉल आला आणि जर तुम्हाला उचलता नाही आला तर तुम्हाला या कॉन्फरन्स कॉलमध्ये पुन्हा सामील होता येणार आहे. मध्येच हा कॉल सोडून rejoin होता येणार आहे. त्यासाठी call log मध्ये जाऊन tap to join वर क्लिक केल्यावर तुम्ही या कॉलमध्ये सामील होऊ शकता. तसेच व्हॉट्सऍपमध्ये call info म्हणून एक स्क्रीन तयार होते त्यात युजरला हा कॉन्फरन्स कॉल कोणी उचलला नाही हे लक्षात येणार आहे. एका व्हिडीओ कॉलमध्ये 8 युजरची मर्यादा असणार आहे.






























































