
पॉर्न फिल्म रॅकेटप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याला पोलिसांनी अटक केली. राज कुंद्राच्या अटकेनंतर बॉलिवूडसह संपूर्ण देशात खळबळ माजली. काल संपूर्ण दिवस शिल्पा शेट्टीला देखील यावरून ट्रोल करण्यात आले. शिल्पाला देखील याबाबत माहित होते का असा सवाल केला जात आहे.
खरंतर शिल्पा शेट्टीने राज कुंद्रासोबत लग्न केले तेव्हा अनेकांच्या भुवया उंचवल्या होत्या. हा राज कुंद्रा आहे तरी कोण, असा प्रश्न अनेकांना पडला होता. कालांतराने राज कुंद्रा एक व्यावसायिक असल्याचेच लोकांपर्यंत पोहोचले होते. मात्र त्याच्याविषयी फार माहिती लोकांसमोर आली नव्हती.
राज कुंद्राचा जन्म हा लंडनमध्ये झालेला. त्याचे वडील हे लंडनमध्ये बस कंडक्टर होते. त्यानंतर त्याच्या वडिलांनी नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय सुरू केला. राजची आई देखील शॉप आर्टिस्ट म्हणून कामाला होती. त्यावेळी त्यांची घरची परिस्थिती जेमतेम होती. मात्र नंतर राजच्या वडिलांचा व्यवसाय चांगला चालू लागला व हे कुटुंब श्रीमंतीकडे वळू लागलं. राजने नंतर अधिक प्रगती करत त्याच्या कुटुंबाला चांगले दिवस दाखवले.
अश्लील उद्योग कंपनीचा राज कुंद्रा कसा अडकला? वाचा सविस्तर बातमी
शिल्पा शेट्टीसोबत केले दुसरं लग्न
शिल्पा शेट्टी ही राजची दुसरी बायको आहे. राज व शिल्पाचे अफेयर सुरू झाले तेव्हा तो आधीच विवाहीत होता. राजने शिल्पाशी लग्न करण्यासाठी त्याची पत्नी कविताला घटस्फोट दिला. कविता व राजचे लग्न अवघे तीन वर्षच टिकले. कविताने घटस्फोटानंतर शिल्पा शेट्टीवर गंभीर आरोप केले होते. शिल्पाने विवाहीत पुरुषासोबत संबंध ठेवून आमचा संसार मो़डला असा आरोप तिने केला होता.




























































