मुंबई विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरु

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांना mum.digitaluniversity.ac या संकेतस्थळावरील mumbai university pre admission online registration 2021-22 या लिंकवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे.

विद्यार्थ्यांनी हमीपत्र भरून कोणत्याही एका महाविद्यालयात प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. महाविद्यालयात हमीपत्रानुसार विद्यार्थ्यांचे प्रवेश तात्पुरते निश्चित केले जातील आणि विद्यार्थ्यांनी कागदपत्रांच्या मूळ प्रती सादर केल्यानंतर अंतिम प्रवेश दिला जाणार आहे.

  • ऑनलाइन फॉर्म सादर करण्याचा दिनांक – 6 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट
  • पहिली गुणवत्ता यादी – 17 ऑगस्ट 2021 (सकाळी 11 वाजता)
  • गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन कागदपत्रे पडताळणी व शुल्क भरणे – 18 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट दुपारी 3 वाजेपर्यंत
  • दुसरी गुणवत्ता यादी – 25 ऑगस्ट 2021 सायंकाळी 7 वाजता
  • ऑनलाइन कागदपत्रे पडताळणी व शुल्क भरणे – 26 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दुपारी 3 वाजेपर्यत
  • तिसरी गुणवत्ता यादी – 30 ऑगस्ट सायंकाळी 7 वाजेपर्यंत
  • ऑनलाइन कागदपत्रे पडताळणी व शुल्क भरणे – 1 सप्टेंबर ते 4 सप्टेंबर

पूरग्रस्त भागातील महाविद्यालयांना ऑफलाइन प्रवेश प्रक्रियेला मुभा

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर या पूरग्रस्त जिह्यांतील महाविद्यालयांना ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत अडचणी येत असतील किंवा प्रतिबंधित क्षेत्रात मोडत असतील तर सुरक्षित अंतराच्या नियमाचे पालन करून ऑफलाइन प्रक्रिया राबवण्यास मुभा देण्यात आली आहे.