
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (आयएसएस) हे अंतराळात बांधलेले संशोधन केंद्र आहे. ते पृथ्वीभोवती फिरते. गेल्या आठवड्यात अंतराळातील आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात मोठा तांत्रिक बिघाड झाला. रशियाच्या एका मॉड्यूलमुळे आयएसएस आपल्या मार्गातून भरटकले. ते चक्क 540 अंशातून फिरल्याची धक्कादायक घटना घडली. त्यानंतर स्पेसक्राफ्ट आणीबाणी घोषित करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आले.
आयएसएसचा फिरण्याचा वेग प्रतिसेपंद 0.56 अंश एवढा होता. त्यामुळे आयएसएसमध्ये उपस्थित असलेले अंतराळवीर किंवा प्रयोगशाळांचे नुकसान झाले नाही. रशियाच्या मल्टीपर्पज लॅब मॉड्यूलचे प्रक्षेपण 21 जुलै रोजी कझाकिस्तान येथून झाले होते. 29 जुलै रोजी हे मॉड्यूलचे आयएसएसशी जोडण्यात आले. त्याच वेळी मोठा तांत्रिक बिघाड झाला. आयएसएस आपली जागा सोडून गोल फिरायला लागले. त्याचा मार्ग भरकटला. नासाने दिलेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक आपल्या मार्गातून 45 अंश बाहेर गेले. त्यानंतर त्याला पूर्वावस्थेत आणण्यासाठी एक उलटी फेरी घ्यावी लागली.

























































