
गेल्या वर्षी कोरोनाच्या साथीमुळे गणपतीला कोकणात जाण्यास चाकरमान्यांसमोर अडथळे निर्माण झाले होते. यंदा मात्र कोरोनाची संख्या कमी झाली आहे. कोकणात जाणाऱया प्रवाशांची संख्या विचारात घेता रेल्वेने कोकण मार्गावर तब्बल दीडशे फेऱया चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
मध्य रेल्वेने 5 जुलै रोजी कोकणात सर्वप्रथम 72 फेऱया चालविण्याचा निर्णय जाहीर केला होता. या ट्रेन सीएसएमटी पनवेल आणि सावंतवाडी रोड, रत्नागिरीदरम्यान सोडण्यात आल्या असून 8 जुलैपासून त्यांचे बुकिंग सुरू होऊन ते जवळपास फुल्ल झाले आहे. आज मध्य रेल्वेने आणखी 40 फेऱया सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जाहीर केले आहे. त्यातच एसटी महामंडळाने यंदा 2200 जादा गाडय़ा चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदाचा कोकणचा गणपती प्रवास सुखकर होणार आहे.
- सीएसएमटी-पनवेल ते सावंतवाडी, एलटीटी ते मडगाव-कुडाळ, पनवेल ते कुडाळ अशा चालविण्यात येणार असून 7 ऑगस्टपासून त्यांचे आरक्षण सुरू होत आहे.
- पश्चिम रेल्वेवरही मडगाव, कुडाळ आणि अहमदाबादच्या सुरतकल आणि सुरत व मुंबई अशा व्हाया वसई, पनवेल, रोहा मार्गे 38 फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.































































