एवढाच जोर असेल, मर्दानगी दाखवण्याची जास्तच हौस असेल तर… फॅन्ड्रीची ‘शालू’ ट्रोलर्सवर संतापली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) आपल्या चित्रपटांमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी देतात. ‘सैराट’ या चित्रपटामध्ये त्यांनी रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर या जोडीला मोठ्या पडद्यावर आणले. तत्पूर्वी त्यांचा गाजलेला आणि अस्सल गावरान साज असलेला ‘फॅन्ड्री’ हा चित्रपटही प्रचंड गाजला. ग्रामिण धाटणीच्या या चित्रपटामध्ये सोमनाथ अवघडे आणि राजश्वरी खरात यांनी भूमिका साकारली होती. या चित्रपटातील राजेश्वरी अर्थात शालू हिची भूमिका प्रचंड गाजली होती. सध्या ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.

राजेश्वरी खरात हिने फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये ती शॉर्ट घालून डान्स करताना दिसतेय. हा व्हिडीओ पाहून काही लोकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. या ट्रोलर्सला राजेश्वरी हिने सणसणीत उत्तर दिले आहे.

‘एवढाच जोर असेल, पुरुषत्व (मर्दानगी) दाखवण्याची जास्तच हौस असेल तर एका मुलीच्या कमेंट बॉक्समध्ये दाखवण्यापेक्षा तुमच्या नेत्यासमोर दाखवा’, असे राजेश्वरी हिने ट्रोलर्सला सुनावले.

rajeshwari