
आरोग्यतज्ञांकडून संभाव्य तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आल्यामुळे पालिका ऑक्सिजन, औषध आणि आरोग्य यंत्रणेसह सज्ज झाली आहे. रुग्णांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी ऑक्सिजन पुरवठा आणि औषध खरेदीचे 36 कोटींचे प्रस्ताव स्थायी समितीत मंजूर करण्यात आले. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी ही माहिती दिली.
कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये ऑक्सिजन पातळी कमी झाल्याने रुग्ण अत्यवस्थ होण्याचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे देशांत अनेक ठिकाणी आणीबाणीची स्थिती निर्माण झाली होती. मात्र पालिकेने केलेल्या सुयोग्य नियंत्रणामुळे मुंबईत गंभीर स्थिती निर्माण झाली नाही. मुंबईत ऑक्सिजनची रोजची गरज 234 मेट्रिक टन आहे. यातील सर्वाधिक पुरवठा पालिकेला बाहेरून घ्यावा लागत होता. मात्र पालिकेने आता ऑक्सिजन स्वयंपूर्णतेकडे वाटचाल सुरू केली आहे. 16 रुग्णालयांमध्ये हवेतून ऑक्सिजन निर्मितीचे प्लांट उभारले जात आहेत. यामध्ये ‘कोविडच्या तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून पालिकेने तयारी सुरू केली आहे. यासाठी ऑक्सिजन, औषध खरेदीपासून विविध खरेदीसाठी सुमारे 36 कोटी रुपयांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. कोविडसाठी आवश्यक नियोजनात कोणतीही कमी पडू देणार नाही, असे यशवंत जाधव यांनी स्पष्ट केले.
अशी होणार ऑक्सिजन, औषध खरेदी
जम्बो कोविड पेंद्रासाठी 20 किलो लिटर, 13 किलो लिटर आणि 10 किलो लिटर क्षमतेच्या प्राणवायूच्या टाक्या उभारून त्यातून प्राणवायूचा पुरवठा करण्यासाठी पंत्राटदार नेमण्यास परवानगी देण्यात आली आहे.
यासाठी चार कोटी 80 लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. तर 200 लिटर क्षमतेचे 110 पोर्टेबल प्राणवायू सिलिंडर विकत घेण्यात येणार असून त्यासाठी 2 कोटी 90 लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.
जम्बो कोविड पेंद्रांसाठी औषध खरेदीसाठी 20 कोटी 72 लाख रुपयांचा खर्च होणार आहे. कांदिवली येथे ईएसआयएस रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी आयसीयू करण्यासाठी 8 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.































































