
युवासेनेच्या वतीने सचिव वरुण सरदेसाई यांचा महाराष्ट्रभर पदाधिकारी संवाद यात्रा सुरू आहे. सहाव्या टप्प्यात विदर्भातील नागपूरमधून आज पासून सुरवात झाली. भंडारा जिल्ह्यात पोहचत त्यांनी युवा शिवसैनिकांना मार्गदर्शन करत युवांचे प्रश्न एकूण घेतले.

राज्यभर पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून तेथील प्रश्न सोडविण्यासाठी युवा पदाधिकारी यात्रा करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. तर नागपूर विद्यापीठाचा उपकेंद्र भंडारा जिल्ह्यात व्हावा यासाठी युवा सेना आंदोलन करेल असा इशारा युवासेना सचिव वरून सरदेसाई यांनी दिला. यावेळी रुपेश कदम आमदार नरेंद्र बोडे, जिल्हा संपर्क प्रमुख निलेश धुमाड, युवडेना जिल्हा समनव्यक रोशन काळे सह जिल्हा भरातील युवासेना पदाधिकारी व महिला शिवसैनिक उपस्थित होते.
































































