केजीएफच्या चाहत्यांना करावी लागणार प्रतीक्षा, या दिवशी होणार रिलीज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दक्षिणेकडचा सुपरस्टार यशचा बहुप्रतिक्षित केजीएफ या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र चाहत्यांना आता या चित्रपटासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

आधी हा चित्रपट येत्या जुलै महिन्यात रिलीज होणार होता. मात्र आता चित्रपटाची रिलीजची तारिख पुढे ढकलली आहे. त्यामुळे चाहते नाराज होणार आहेत. आज रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर या चित्रपटाचा मुख्य अभिनेता यशने आज रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख जाहीर केली आहे.

kgf_2_new_700x450

यशने ट्विट करत दिलेल्या माहितीनुसार, जसे आम्ही तुम्हाला वचन दिले होते आम्ही येतोय. येत्या 14 एप्रिल 2022 ला आम्ही थिएटर्समध्ये रिलीज होणार आहोत’, असे ट्विट यशने केले आहे. सोबत त्याने केजीएफ 2 चे एक जबरदस्त पोस्टर शेअर केले आहेत.

केजीएफचा टीझर –