मंडणगड-मुंबई रस्त्याची दुरवस्था; राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मंडणगड म्हाप्रळ मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. मात्र, रस्त्यांची दुरुस्ती करण्याकडे दुलर्क्ष करून केंद्र शासनाच्या अखत्यारीतीतील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण बघ्याची भूमिका घेत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

मंडणगड तालूक्यातील आंबडवे या गावात जाण्यासाठी केंद्र शासनाने मंडणगड आंबडवे ते महाड तालूक्यातील राजावाडीपर्यंतचा मार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून त्याला दर्जा देत नवा राष्ट्रीय महामार्ग तयार करण्याचे काम सुरू केले आहे. हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखला जाणार असला तरी आधीच्याच मागार्वरून हा राष्ट्रीय महामार्ग जात आहे. राष्ट्रीय महामार्ग होण्याआधी येथील सावर्जनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेला त्यावेळचा रस्ता सुस्थितीत होता. मात्र गेल्या पाच वषार्पासून सुरू असलेले महामार्गाचे काम पुर्ण करण्यास केंद्र शासनाचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अपयशी ठरले आहे. त्यासाठी अजून किती काळ वाट पाहावी लागणार, असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत.

महामार्गासाठी भुसंपादन केलेल्या जमिनीचे भाडेदेखील अद्याप जमिन मालकांना देण्यात आलेले नाही. भूसंपादनाची राबविलेली प्रक्रीयाच चुकीची असल्याचा ठपका ठेवत मंडणगडातील लोकांनी अनेकदा यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहे. त्यामुळे जमिनीचे भाडे देणेही शक्य नाही आणि रस्त्याचे काम करणेही शक्य नाही. त्यामुळे दूरवस्था झालेल्या मागार्वरूनच गेले पाच वर्ष दापोली आणि मंडणगड येथील लोकांना याच मार्गाने करावा लागत आहे. त्यामुळे या मागार्वरून प्रवास करणाऱ्यांचे या जीवघेण्या प्रवासाने कंबरडे मोडत आहे. तसेच वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

केंद्र शासनाने प्राधिकृत केलेल्या आणि रायगड जिल्ह्यातील महाड तालूक्यात असलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या देखरेखीखाली या महामार्गाचे काम सुरू आहे. मंडणगड दापोली तालूक्यापासून दूर असलेल्या या प्राधिकरणाच्या कायार्लयात रस्त्याच्या कामासंदभार्त चौकशीसाठी महाड येथे जाणे शक्य होत नाही. ते या महामार्गाची पाहणी करण्यासाठीही आलेले नाहीत.