
अफगाणिस्तानवर आता तालिबान्यांच्या कब्ज्यात झाला आहे. याचाच परिणाम संपूर्ण जगावर होत आहे. सर्व देश तेथून आपल्या नागरिकांच्या सुरक्षित आपल्या देशात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी फोनवर जवळपास 45 मिनिटे चर्चा केली आहे. दोन्ही राष्ट्रप्रमुखांनी अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर सविस्तर चर्चा केली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, ‘माझे मित्र राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याशी अफगाणिस्तानमधील अलीकडील घडामोडींवर तपशीलवार आणि उपयुक्त चर्चा करत विचारांची देवाणघेवाण केली. आपल्या द्विपक्षीय अजेंडा विषयांवर देखील चर्चा केली, ज्यात कोविड -19 विरुद्ध हिंदुस्थान-रशिया सहकार्याचा समावेश आहे. आम्ही महत्त्वाच्या मुद्द्यांवर सल्लामसलत सुरू ठेवण्याचे मान्य केले आहे.’
Had a detailed and useful exchange of views with my friend President Putin on recent developments in Afghanistan. We also discussed issues on the bilateral agenda, including India-Russia cooperation against COVID-19. We agreed to continue close consultations on important issues.
— Narendra Modi (@narendramodi) August 24, 2021
सध्या जगासमोर तालिबान सरकारला मान्यता द्यायची की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अनेक देशांनी याचा उघडपणे विरोध केला आहे. तर काही देशांनी तालिबान्यांच्या समर्थनात घोषणा केली आहे. तालिबानने चीन आणि पाकिस्तानच्या वरिष्ठ मंत्र्यांसोबत स्वतंत्र बैठका घेतल्याची माहिती देखील समोर येत आहे.



























































