
हिंदुस्थान आणि इंग्लंड संघात लीड्समध्ये तिसरा कसोटी सामना सुरू असून यजमान संघाने यावर वर्चस्व मिळवले आहे. हिंदुस्थानला 78 धावांमध्ये गुंडाळल्यानंतर इंग्लंडने दुसऱ्या दिवसअखेर 8 बाद 423 धावा केल्या असून 345 धावांची आघाडी घेतली आहे. लॉर्डस कसोटीमध्ये विजय मिळवल्यानंतर लीड्स कसोटीमध्ये आर. अश्विनला अंतिम 11 मध्ये संधी मिळेल अशी आशा होती, मात्र हिंदुस्थानने विजयी संघच खेळवला.
आर. अश्विन कसोटी क्रमवारीत हिंदुस्थानचा अव्वल गोलंदाज आहे. तरीही इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या मालिकेत त्याला अद्याप संधी मिळाली नाही. आर. अश्विन याच्या ऐवजी रविंद्र जडेजा याला विराट कोहली खेळवत आहे. मात्र गोलंदाजीमध्ये जडेजाची कामगिरी यथातथाच राहिली आहे, तसेच फलंदाजीमध्येही तो विशेष कामगिरी करू शकलेला नाही.
फिरकीपटू अश्विनला संघाबाहेर ठेवण्याच्या प्रश्नावर कर्णधार विराट कोहली याने खुलासा केला आहे. आम्ही अश्विनबाबत विचार केला होता, परंतु इंग्लंडसारख्या परिस्थितीमध्ये वेगवान गोलंदाजांना संघात स्थान देण्याचा दबाव असतो. या कसोटीत जडेजाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. खेळपट्टी फिरकीपटूला साथ देणारी असल्याचे दिसत आहे, असेही विराट कोहली म्हणाला.
INDvENG ‘गर्व खिशात ठेव आणि…’ सतत ‘फ्लॉप’ होणाऱ्या कोहलीवर दिग्गजाने साधला निशाणा
डाव उलटा पडला
दरम्यान, लीड्समध्ये अश्विनला डावलून जडेजाला संधी देणे विराट कोहलीच्या पथ्यावर पडले आहे. पहिल्या डावात जडेजाने फक्त 4 धावा केल्या, तसेच गोलंदाजीमध्ये देखील 2 बळींसाठी त्याला झगडावे लागले. अश्विनबाबद मोहम्मद शमीनेही प्रतिक्रिया दिली असून अश्विनच्या जागी जडेजाला संघात खेळवण्यात येईल असे संघाने ठरवले. तुम्ही याबाबत जास्त विचार करू शकत नाही, असेही तो म्हणाला.
INDvENG धावसंख्या विचारून इंग्लंडच्या चाहत्यांनी डिवचले, सिराजने उत्तर देऊन बोलती केली बंद
नबर दोनचा गोलंदाज
आयसीसी क्रमवारीमध्ये आर. अश्विन नंबर दोनचा गोलंदाज आहे. यंदाच्या वर्षी सर्वाधिक बळी घेणाऱ्या फिरकी गोलंदाजांमध्ये अश्विन संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहे. अश्विनसोबत इंग्लंडचा फिरकीपटू जॅक लीचने सर्वाधिक 26 बळी घेतले आहे. विशेष म्हणजे लीचला देखील इंग्लंडने आपल्या संघात स्थान दिलेले नाही.




























































