जगातील सर्वाधिक उंचीवरील थिएटरमध्ये बेलबॉटम, हिंदुस्थानात आहे ही जागा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या दुसऱया लाटेमुळे अजूनही बहुतेक राज्यांमध्ये थिएटर सुरू झालेली नाहीत, तरीही अक्षय कुमार हा एकमेव अभिनेता आहे, ज्याने थिएटरमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्याचे धाडस दाखवले होते. त्याचा ‘बेलबॉटम’ हा चित्रपट चांगली कमाईदेखील करत आहे. आता हा चित्रपट जगातील सर्वात उंचीवर असलेल्या मोबाईल थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. अक्षयनेच सोशल मीडियावरून याबाबत माहिती शेअर करत आपला आनंद व्यक्त केला आहे.

अक्षयने ट्विटमध्ये म्हटलेय, ‘माझा बेलबॉटम हा चित्रपट जगातील सर्वात उंचीवर असलेल्या लेहमधील मोबाईल थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. हे थिएटर समुद्र सपाटीपासून 11,562 फूट उंचीवर असून उणे 28 अंश सेल्सिअसवरदेखील काम करू शकते. किती आश्चर्यकारक आहे हे.’ बेलबॉटम हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून यात अक्षयने रॉ एजंटची भूमिका साकारली आहे.