
नारळाच्या करवंटय़ा आपण टाकाऊ म्हणून फकून देतो, पण याच करवंटय़ांचा वापर करून भुवनेश्वरच्या कलावंताने किमया केली. देवीप्रसाद दास असे या कलावंताचे नाव असून ते करवंटय़ापासून खूप सुंदर मोर बनवतात. हे मोर करवंटय़ापासून बनवले आहेत, असं बघताक्षणी कुणाला वाटणार नाही. फक्त मोर नव्हे तर दागिने आणि सजावटीच्या वस्तूही ते तयार करतात. आहे की नाही, करवटय़ांची जादू.
41 वर्षीय देवीप्रसाद गेली अनेक वर्षे करवंटय़ापासून शोपीस बनवत आहेत. त्यांनी स्वतःचा व्यवसायही उभा केला आहे. एवढेच नव्हे तर ते ग्रामीण भागातील लोकांना याचे प्रशिक्षणही देत आहेत. नारळाच्या करवंटय़ा गोळा करून त्यापासून अँटिक ज्वेलरी, होम डेकोरेटिव्ह वस्तू तसेच राष्ट्रीय पक्षी मोर पिंवा अन्य प्राणी ते साकारतात. करवंटय़ा अत्यंत कुशलपणे कापणे, त्यांचे तुकडे चिकवटणे अशी ही प्रक्रिया असते. मोर पिंवा दागिने यांना रंग देण्यासाठी ते पर्यावरणपूरक रंगांचा वापर करतात.
अनोख्या कलेविषयी देवीप्रसाद म्हणाले, ओडिशामध्ये दरदिवशी टाकाऊ म्हणून फेकलेल्या नारळाच्या करवंटय़ा मी बघत होतो. विशेषतः मंदिर प्रशासनाने फेकलेल्या करवंटय़ा, त्यांचा काही वेगळा वापर करता येईल का या दृष्टीने मी विचार केला. या ‘वेस्ट’मधून ‘वेल्थ’ तयार करण्याचे ठरवले. जेणेकरून पर्यावरण संवर्धनाची माझी ‘पॅशन’ मला जपता येईल.
देवीप्रसाद यांनी आपल्याजवळची कला अनेकांना दिली आहे. ज्या लोकांना करवंटय़ांपासून शोपीस बनवण्याची कला शिकायची आहे, अशांना खास करून ग्रामीण भागातील लोकांना ते शिकवतात. भुवनेश्वर येथील घरी त्यांनी प्रशिक्षण पेंद्र सुरू केले आहे. तिथे अनेक जण शिकण्यासाठी येतात.
























































