
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया सातही तलावांत या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे ऑक्टोबर संपण्याआधीच वर्षभराचा पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे मुंबईची पाण्याची चिंता मिटली आहे. सद्यस्थितीत सातही तलावांत 1431002 दशलक्ष लिटर म्हणजेच 99 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.
मुंबईला मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा तलाकांतून दररोज 3800 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मुंबईकरांसाठी वर्षभराच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी 1 ऑक्टोबर रोजी 1447363 दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा असणे गरजेचे असते. यावेळीचा उपलब्ध जलसाठा पाहून पालिका वर्षभराच्या पाणीपुरवठय़ाचे नियोजन करते. या वर्षी वर्षभराच्या नियोजनासाठी केवळ 16361 दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. सद्यस्थितीत तलावक्षेत्रात सुरू असलेला पाऊस पाहता हा कोटा लवकरच पूर्ण होईल अशी अपेक्षा पालिका प्रशासनाने व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून तलावक्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे तलाकांत 99 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.
तलाकांतील पाणीसाठा
(दशलक्ष लिटर)
तलाक पाणीसाठा
- अप्पर वैतरणा 225601
- मोडकसागर 128925
- तानसा 143769
- मध्य वैतरणा 186236
- भातसा 710727 विहार 27698
- तुलसी 8046
- तीन वर्षांचा
- 22 सप्टेंबरचा जलसाठा
- 2021 1431002
- 2020 1431963
- 2019 1423900































































