पोलीस डायरी – घातकी प्रियकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime

>> प्रभाकर पवार

सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात मुंबईतील साकीनाका परिसरात एका महिलेवर बलात्कार करून तिची क्रूरपणे हत्या करण्यात आली. हे भीषण कृत्य करून आपल्या यूपीतील गावी पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱया आरोपीला साकीनाका पोलीस ठाण्यातील कर्तव्यदक्ष फौजदार उमेश दगडे, भगवान तुळशीराम टोपले, सुरेश ज्ञानोबा ढवळे व प्रकाश रघुनाथ पाटील या पोलीस पथकाने केवळ 24 तासांत अटक करून पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, मुंबईची कायदा आणि सुव्यवस्था पाहणारे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्याकडून शाबासकी मिळविली. हृदय हेलावून टाकणाऱया, काळजाचा थरकाप उडविणाऱया या घटनेची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली. महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पोलीस ठाण्यात निर्भया पथक स्थापन करण्यात आले. मुंबईचे धडाडीचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या देखरेखीखाली पोलिसांकडून जनजागृती सुरू झाली. दिवस-रात्र पोलिसांच्या गस्ती सुरू झाल्या. नांगरे पाटील स्वतः प्रत्येक पोलीस ठाण्याला, शाळा, कॉलेज, महिला वसतिगृहांना भेट देऊ लागले असतानाच डोंबिवलीतील गँगरेप प्रकरण उघडकीस आले आणि पुन्हा पोलिसांना व सरकारला विरोधकांनी आरोपीच्या पिंजऱयात उभे केले. इयत्ता नववीमध्ये शिकणाऱया पंधरा वर्षांच्या एका मुलीवर गेल्या वर्षभरात अनेक वेळा तिच्याच प्रियकर व मित्रांकडून सतत अत्याचार झाल्याचे मानपाडा पोलिसांच्या तपासात उघड झाले. त्यातील 33 तरुणांना अटक करण्यात आली आहे. कठोर कारवाई करून पोलिसांनी आपली कामगिरी चोख बजावली आहे, तरीही विरोधकांकडून आरोप होतच आहेत. डोंबिवलीतील पीडित अल्पवयीन मुलगी गरीब कुटुंबातील आहे. ऑनलाइन अभ्यासामुळे तिच्या हातात सतत मोबाईल असायचा. त्यातून तिची अनेक मुलांशी मैत्री वाढली होती. अभ्यासासाठी मैत्रिणीकडे जाते असे सांगून ती मुलगी एक दिवस रात्री घरी आली नाही तेव्हा आईला संशय आला. त्यातून हे प्रकरण उघडकीस आले. गेल्या वर्षभरात तिच्याशी तीस ते पस्तीस तरुणांचा संबंध आला होता; परंतु तिने कधी तक्रार केली नव्हती. पकडण्यात आलेले आरोपीही गरीब घरातील व वेगवेगळय़ा जाती-जमातीमधील आहेत. मोबाईलद्वारे संपका&त असणाऱया तरुणांनी पीडित मुलीच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन तिच्याबरोबर दुष्कृत्य केले, परंतु या साऱया क्षणिक मनोविकृतीमुळे त्या तरुणांचे अधःपतन झाले आहे. जेलमध्ये असणाऱया या आरोपींची लवकर सुटकेची अजिबात शक्यता नाही. त्यामुळे कोणत्याही महिलेकडे भोगवस्तू म्हणून पाहणाऱया विकृतांनो सावधान! अबलेकडे वाकडय़ा नजरेने पाहाल, त्यांच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न कराल तर तुमची जागा मरेपर्यंत जेलमध्ये असेल हे लक्षात ठेवा.

मुंबईसह देशभरात महिलांविषयक अत्याचाराच्या तक्रारींची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. स्ट्रीट क्राइमपेक्षा सायबर क्राइमने उच्चांक गाठला आहे. याला कारणीभूत आपल्या हातातील मोबाईल आहे. मुले-मुली बिघडत आहेत. व्यसनाधीन होत आहेत. दारू, चरस, गांजा या साऱया गोष्टी आता आजच्या पिढीला नवीन राहिलेल्या नाहीत. त्यांच्यासाठी ‘कॉमन’ झाल्या आहेत. वीकएण्ड त्यांच्यासाठीच आहे. कुठेतरी एकत्र जमायचे, पाटर्य़ा झोडायच्या, त्यातूनच गँगरेपचे प्रकार घडतात. अति झाले, अत्याचार वाढले. आईवडिलांना कळले की, मग पोलिसांत धाव घेतली जाते. संमतीने, स्वेच्छेने केलेले पाप बलात्कारात वर्ग केले जाते. त्यामुळे सध्या पोलिसांचा ‘ताप’ वाढला आहे. खोटय़ा तक्रारी खऱया असल्याचे मानून गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यामुळे ब्लॅकमेलर महिलांचेही फावले आहे. हे आता थांबवणे कठीण आहे. कारण मनुष्याची प्रवृत्ती, विकृती बदलली आहे. नैतिकता, बंधुभाव संपला आहे. द्वेष वाढू लागला आहे. घराघरामध्ये आईवडिलांची भांडणे मुलांना रोज पाहावी लागत आहेत. त्यातून मुलांवर काय संस्कार होणार? अशी मुलं बिघडतात. व्यसनाधीन होतात. मोबाईलमधील अश्लील व्हिडीओ बघून मग वाममार्गाला लागतात. शाळा, कॉलेजात गुरुजनांकडून, आईवडिलांकडून पूर्वी मुलांवर चांगले संस्कार व्हायचे, परंतु हातात मोबाईल आल्याने मुलांवर चांगल्या संस्कारांऐवजी वाईटच परिणाम अधिक होत आहेत. मोबाईलचा जन्म झाला तेव्हा जगात ‘संपर्क क्रांती’ झाली असे वाटले होते, परंतु आता दुप्रवृत्ती त्याचा गैरवापर अधिक करीत आहेत. डोंबिवलीतील ज्या मुलीवर अत्याचार करण्यात आले त्याचे व्हिडीओ शूटिंग करून त्या मुलीला ब्लॅकमेल करण्यात येत होते. अशा मुली ज्या कुणी नराधमांच्या संपका&त येतात, ते नराधम ब्लॅकमेलिंगच करतात. त्या मुलीच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन वर्षानुवर्षे त्यांच्यावर अत्याचार करतात. मोबाईल हा एक जीवनावश्यक भाग झाला आहे. आपण जगातील कोणत्याही कोपऱयात असणाऱया व्यक्तीशी संपर्क साधू शकतो, परंतु याचा गैरफायदा, फ्रॉड, बदमाश व्यक्ती अधिक घेत आहेत. अनेकांची लाखो रुपयांची इंटरनेटद्वारे फसवणूक केली जात आहे. त्यामुळे मोबाईल, इंटरनेट हे शाप की वरदान? असा कधी कधी प्रश्न पडतो. डोंबिवलीमधील अल्पवयीन मुलीला ऑनलाइन शिकण्यासाठी आईवडिलांनी मोबाईल दिला, परंतु त्याच मोबाईलने व तिच्या प्रियकराने तिचा घात केला. प्रियकर हा कामांध, आपल्या प्रेयसीला दुसऱयाच्या स्वाधीन करणारा नको, तर तो तिच्यावर प्रेम करणारा हवा, तिच्यासाठी लढणारा हवा, परंतु अलीकडे असे मजनू शोधावे लागत आहेत.

गेल्याच आठवडय़ात गिरगाव चौपाटीवर फिरून रात्री 2 वाजता चेंबूर येथे पोचलेल्या एका प्रेमी युगुलाला शस्त्र्ााचा धाक दाखविण्यात आला. मुलीबरोबर असणाऱया तरुणाला जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. तेव्हा तो तरुण तिचे रक्षण करण्याऐवजी चक्क पळून गेला. मुलगी त्या शस्त्र्ाधारी गुंडाच्या ताब्यात सापडली. त्याने तिला धमकावून आडोशाला नेले आणि तिच्यावर बलात्कार करून नंतर सोडून दिले. त्या नराधमाला चेंबूर पोलिसांनी पकडले. तेव्हा आता मुलींनीही आपल्या प्रियकरांवर किती विश्वास ठेवावा याचा विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

लिपिक संवर्गातील परिक्षा कायमस्वरूपी रद्द करून विनाअट कालबद्ध पदोन्नती मिळावी यासाठी महापालिकेच्या लिपिक कर्मचाऱयांनी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांची भेट घेतली. यावेळी आपण लवकरच महापौर आणि पालिका आयुक्तांसोबत भेट घडवून आणून हा प्रश्न निकाली काढणार असल्याचे स्पष्ट केले.