सुशांत सिंहच्या मित्राला एनसीबीने केली अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत ड्रग्ज लिंकप्रकरणी अखेर नाकाxटिक्स पंट्रोल ब्युरो (एनसीबी)ने हॉटेल व्यावसायिक कुणाल जानीला अटक केली आहे. ‘एनसीबी’चे पथक हे गेल्या काही महिन्यांपासून पुणालचा शोध घेत होते. अखेर आज ‘एनसीबी’ने पुणालला खार परिसरातून अटक केली.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने वांद्रे येथील घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. सुशांतच्या आत्महत्येनंतर ड्रग्ज लिंक समोर आल्यावर ‘एनसीबी’ने तपासाची सूत्रे हाती घेतली. ‘एनसीबी’ने तपास करून सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीलादेखील अटक केली होती. ड्रग्जप्रकरणी तपासासाठी दिल्लीहून खास एक पथक मुंबईत आले होते. या पथकाने अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान आणि रकुल प्रीतचीदेखील चौकशी केली होती. चौकशीदरम्यान काही ड्रग्ज तस्करांची नावे समोर आल्यावर त्या तस्करांच्यादेखील ‘एनसीबी’ने मुसक्या आवळल्या होत्या. सुशांत सिंह ड्रग्ज प्रकरणात एकाच्या चौकशीत पुणालचे नाव समोर आले. ड्रग्ज लिंक समोर आल्यानंतर ‘एनसीबी’ कुणालचा शोध घेत होती.