कोंडगाव परिसरात तुफानी वादळी पाऊस; झाडे कोसळल्यामुळे घरांचे नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देवरुख तालुक्याच्या अनेक भागात सोमवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे साखरपा नजीकच्या कोंडगाव परिसरात अनेक घरांवर झाडे उन्मळून पडली आहेत. यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे.

अचानक ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे अनेक ओढ्यांना मोठे पाणी आले. त्याचप्रमाणे विजांच्या कडकडाटासह पर्जन्यवृष्टी झाली. वादळी वाऱ्यामुळे परिसरातील अनेक घरांवर झाडे कोसळल्यामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे. कोंडगाव तलाठी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामे सुरू केले आहेत. त्याचबरोबर भात पिकांचेही नुकसान झाले आहे.