
फेसबुकची मालकी असलेले फेसबुक, व्हॉटस् अॅप, इन्स्टाग्राम एकाच वेळी डाऊन झाले. सोमवारी रात्री 9 नंतर अचानक झालेल्या या प्रकारामुळे युजर्सही गोंधळून गेले. रात्री उशिरापर्यंत हा गोंधळ सुरूच होता. युजर्सच्या तक्रारीची दखल घेत फेसबुकने लवकरात लवकर आपली सेवा पूर्ववत करू असे आश्वासन दिले.
हा तर सायबर अॅटॅक; फेसबुकचे शेअर्स कोसळले
रात्री 9 नंतर दोन ते अडीच तास फेसबुक, व्हॉटसअॅप, इन्स्टाग्राम सुरूच होत नसल्याने तज्ञांची टीम कामाला लागली. सुरुवातीला सर्व्हर डाऊन झाल्याचे सांगितले जात असतानाच फेसबुकवर सायबर अॅटॅक झाल्याची भीतीही वर्तवण्यात आली. फेसबुकने ट्विटरचा आधार घेत तांत्रिक बिघाड लवकरात लवकर दुरुस्त करू असा नेटकऱयांना दिलासा दिला, तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात फेसबुकचे शेअर्स 6 टक्क्यांनी कोसळले.
























































