
कॉपीराईटच्या नावाखाली 77 हजारांची खंडणी उकळल्याप्रकरणी नोव्हेक्स कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड आणि फोनोग्राफीक परफॉरमन्स लिमिटेड विरोधात चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॉपीराईट प्रकरणात दाखल झालेला तिसरा गुन्हा आहे. व्यावसायीक शुभम अरूण दुग्गड (वय 27, रा. मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर) यांनी फिर्याद दिली आहे.
शुभम यांचा प्रिटिंगचा व्यवसाय असून त्यांचा विवाह सेनापती बापट रस्तवरील विवाह पंचतारांकित हॉटेलमध्ये 13 जुलैला करण्याचे ठरविले. दि. 15 जुन रोजी हॉल बुक करण्यात आले. त्यावेळी हॉटेल व्यवस्थापनाने शुभम यांना तुम्ही म्युजिक वाजविणार असाल तर पीपीएल, नोव्हेक्स कंपनीचे लायसन्स घ्यावे लागे असे सांगितले. त्यावेळी त्यांचे लायसन्स घेतल्यास लग्नसमारंभामध्ये आडथळे आणतात दंड देखील वसूल करतात किंवा हॉटेलला नोटीस देतात असे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. लग्नात अडथळा नको म्हणून शुभम यांनी 77 हजार 400 रूपये भरले. परंतु, त्यांनी जेव्हा परवाना पाहिला तेव्हा त्यांना त्या परवान्यावर लग्न समारंभ उल्लेख न करता गेट टुगेदर पार्टी असा उल्लेख करण्यात आला होता. दरम्यान, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कॉपाी राईटसाठी पैसे घेतले असेल तर तक्रार करा असे अवाहन केल्याचे दिसले. त्यानुसार फसवणूक झाल्याने शुभम यांनी फोनाग्राफीक परफॉरर्मन्स लिमिटेड (पीपीएल) व नोव्हेक्स कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या पदाधिकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.






























































