तरुणीचा पाठलाग करत दाखवले गुप्तांग, आरोपीला 3 वर्षाची शिक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
molestation-1

मुंबईत एका विकृत व्यक्तीने तरुणीचा पाठलाग केला आणि तिला गुप्तांग दाखवले. याप्रकरणी न्यायालयाने आरोपीला तीन वर्षाची शिक्षा सुनावली आहे.

18 सप्टेंबर रोजी मुंबईतील चर्चगेट येथील महर्षी कर्वे मार्गावर एक तरुणी जात होती. तेव्हा राजकुमार तांडेल हा 53 वर्षीय व्यक्ती या तरुणीचा पाठलाग करत होता. नंतर काही अंतरावर तांडेलने तरुणीला आपले गुप्तांग दाखवले. या प्रकरणी तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी कारवाई करत तांडेलला अटक केली. आज न्यायालयाने तांडेलला तीन वर्षाची कारावासाची शिक्षा सुनावली आहे.