
एखाद्या देशात टंचाई निर्माण होणं ही गंभीर स्थिती आहे. अर्थात ती टंचाई नेमक्या कोणत्या वस्तू किंवा पदार्थाची आहे, त्यावर त्या टंचाईचं गांभीर्य अवलंबून असतं.
सध्या युनायटेड किंग्डम देखील अशाच एका टंचाईला सामोरं जात आहे. त्यामुळे विक्रेत्यांनी या परिस्थितीचा फायदा उचलायचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या वस्तुची किंमत सध्या चौपटीने वधारली आहे.
ही वस्तू म्हणजे पुरुषांची अंतर्वस्त्र. पुरुषांच्या अंतर्वस्त्रांची किंमत सध्या इंग्लंडमध्ये चौपटीने वाढली आहे. कारण, अंडरवेअर्सची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. चौपटीने महाग मिळत असल्या तरी लोक त्या खरेदी करत आहेत.
ही महागाई होण्याचं कारण बिघडलेलं हवामान आहे. या हवामानामुळे यंदा कापसाच्या पिकाचं नुकसान झालं आहे. त्यामुळे घाऊक बाजारात कच्चा माल मिळणं कठीण झालं आहे. कापसाच्या किंमतींमध्ये 40 पटींनी वाढ झाली आहे. त्याखेरीज वाहतुकीचे दरही 900 पटींनी वाढले आहेत. त्यामुळे त्याचा थेट परिणाम अंडरवेअर्सच्या किमतीवर झाला आहे.
अंडरवेअर्सखेरीज पायजमे आणि इतर सुती कपड्यांच्या निर्मितीवरही त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे दुकानदारांकडे आत्ता जितका साठा उपलब्ध आहे, तो त्यांना दुप्पटीहून अधिक किमतीत विकावा लागत आहे.



























































