कोरोनाचा दिलासा; रुग्णसंख्या घटली, सात महिन्यात सर्वात कमी अॅक्टिव्ह रुग्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात कोरोनाचा प्रकोप कमी होताना दिसत आहे. गेल्या 24 तासात कोरोना रुग्णांची संख्या घटली असून गेल्या सात महिन्यात सर्वात कमी अॅक्टिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. हा मोठा दिलासा आहे. गेल्या 24 तासात देशभरात 18,166 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 214 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण 2,30,971 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर सक्रीय रुग्णांमध्ये 5,672 रुग्णांची घट झाली आहे. त्यामुळे गेल्या सात महिन्यात सर्वात कमी अॅक्टिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे.

देशातील कोरोना संक्रमितांचा आकडा 3,39,53,475 वर पोहचला आहे. शनिवारी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार 19,740 नवे रुग्ण आढळले होते. तर 248 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सलग 16 व्या दिवशी 30,000 पेक्षा कमी रुग्ण आढळले आहे. हा मोठा दिलासा आहे. तसेच गेल्या 24 तासात एकूण 23,624 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

देशातील कोरोनाचा रिकव्हरी रेट 97.99 टक्के आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांच्या संख्येत घट होऊन ती संख्या 2,30,971 झाली आहे. केरळमध्ये गेल्या 24 तासात 9,470 रुग्ण आढळले आहेत. देशात केरळमध्ये सर्वात जास्त रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. या आकडेवारीनुसार देशातील कोरोना आता नियंत्रणात येत असल्याचे दिसत आहे. तसेच गेल्या सात महिन्यात सर्वात कमी अॅटिव्ह रुग्णांची नोंद झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.