
बॉलीवूडमधील सर्वात आदर्श जोडपे म्हणून महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री जया बच्चन या जोडीकडे पाहिले जाते. त्यांच्या लग्नाला 48 वर्षे पूर्ण झाली आहेत. 3 जून 1973 रोजी त्यांनी लग्नगाठ बांधली होती. त्यावेळी अमिताभ बच्चन यांच्या वडिलांनी म्हणजेच हरिवंशराय बच्चन यांनी घातलेल्या अटीमुळे या जोडप्याने घाईत लग्न उरकले होते. याबद्दलचा किस्सा अमिताभ यांनीच सोशल मीडियावरून सांगितला आहे. अमिताभ यांनी सांगितलं की, ते आणि जया ‘जंजीर’ या चित्रपटात एकत्र काम करत होते, त्यावेळी ठरलं होतं की जर हा चित्रपट हिट ठरला तर सर्वांनी लंडनला फिरायला जायचं. मग यावर हरिवंशराय बच्चन यांनी सांगितलं की, फक्त लग्नानंतरच तुला जयासोबत फिरायला जायची परवानगी मिळेल. त्यावेळी अमिताभ यांनी त्यांना सांगितलं की, मग आम्ही लग्न करतो. त्यानंतर घाईत या जोडप्यानं अत्यंत साधेपणानं लग्न उरकलं होतं.

























































