
इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी संस्थेच्या वतीने हरित ऊर्जानिर्मितीसाठी दिला जाणारा यंदाचा ‘इंडिया ग्रीन एनर्जी’ हा पुरस्कार महानिर्मितीला जाहीर झाला आहे. त्याची दखल घेत ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महानिर्मितीचे अभिनंदन केले आहे. मुख्यमंत्री कृषी वाहिनी योजनेंतर्गत उभारण्यात आलेले व नियोजित सौर ऊर्जा प्रकल्पांची दखल घेत महानिर्मितीला हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.





























































