
हिंदुस्थानचा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणने आपला एके काळचा सहकारी असलेल्या राहुल द्रविडची जागा घेण्यास नकार दिला आहे. द्रविड सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (एनसीए) प्रमुख आहे. मात्र, टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर द्रविडवर ‘टीम इंडिया’च्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. त्यामुळे एनसीएचे प्रमुखपद रिक्त होणार आहे. याच कारणामुळे हे पद लक्ष्मणने स्वीकारावे असे ‘बीसीसीआय’ला वाटत होते. मात्र, त्याने एनसीएच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला.
बीसीसीआयने व्हीव्हीएस लक्ष्मणशी याप्रकरणी संपर्क साधला होता. मात्र, त्याने हे पद स्वीकारण्यात रस दाखवला नाही. द्रविडप्रमाणे, लक्ष्मण देखील त्याच्या काळातील एक महान फलंदाज होता. या दोन खेळाडूंची शंभरहून अधिक कसोटी खेळल्या असून, अनेक चांगल्या भागीदाऱयाही केल्या आहेत.
यंदाच्या टी-20 विश्वचषकानंतर हिंदुस्थानी संघाचे प्रशिक्षकपद रिक्त होईल. रवी शास्त्र्ााRबरोबरच कोचिंग स्टाफची इतर पदेही रिक्त होतील. त्यामुळे ‘बीसीसीआय’ने दोन वर्षांसाठी राहुल द्रविडकडे टीम इंडियाचे प्रशिक्षकपद सोपविण्याचा निर्णय घेतलाय. मात्र, असे असूनही बीसीसीआयने हिंदुस्थानी संघाच्या मुख्य प्रशिक्षकासाठी अर्ज मागवले आहेत.

























































