राज्य शिक्षण मंडळाच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर; दहावीत 29.14 तर बारावीत 25.87 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये घेण्यात आलेल्या दहावी, बारावी फेरपरीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. दहावीच्या परीक्षेत 29.14 तर बारावीच्या परीक्षेत 27.31 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यातील नऊ विभागीय शिक्षण मंडळांमध्ये सर्वाधिक निकाल लातूर विभागाचा लागला आहे, तर दहावीतील 47 आणि बारावीतील 53 विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्ये उत्तीर्ण झाले आहेत.

राज्यातील एपूण 10 हजार 477 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी 3053 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर बारावीच्या जुन्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेला बसलेल्या 12 हजार 160 विद्यार्थ्यांपैकी 3 हजार 322 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नवीन अभ्यासक्रमाची परीक्षा दिलेल्या 1809 विद्यार्थ्यांपैकी 468 जण उत्तीर्ण झाले आहेत. लातूर विभागाचा बारावीचा निकाल 36.49 टक्के (नवीन अभ्यासक्रमानुसार), तर जुन्या अभ्यासक्रमाचा निकाल 47.10 टक्के इतका लागला आहे. दहावीच्या निकालातही लातूर विभागाने बाजी मारली असून 36.49 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

मुंबईचा दहावीचा निकाल 15.06 तर बारावीचा निकाल 19.55 टक्के

मुंबई विभागीय शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल 15.06 टक्के तर बारावीचा निकाल 19.55 टक्के इतका लागला आहे. दहावीच्या परीक्षेला एपूण 3,699 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 767 जण उत्तीर्ण झाले, तर बारावीच्या नव्या अभ्यासक्रमाची परीक्षा दिलेल्या 498 विद्यार्थ्यांपैकी 76 जण उत्तीर्ण झाले. जुन्या अभ्यासक्रमाच्या 4,951 विद्यार्थ्यांपैकी 968 जण उत्तीर्ण झाले.

ssc-reexam