
ठाण्यासह राज्यातील महाविद्यालयांची घंटा बुधवारी पुन्हा वाजली. कॅम्पस पूर्वीप्रमाणे विद्यार्थ्यांनी गजबजला. तब्बल दीड वर्षानंतर महाविद्यालयात पुन्हा पाऊल ठेवताना विद्यार्थ्यांच्या डोळ्यात आनंद होता. कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करून पहिल्या दिवसाची सुरुवात झाली. प्रवेशद्वारावर थर्मल चेकिंग करूनच विद्यार्थ्यांना प्रवेश दिले गेले. अनेक महाविद्यालयांमध्ये गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले गेले.


























































