10 कोटींचे कपडे घालून कोण अधिकारी फिरतो का? – नवाब मलिक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

”काल देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नवाब मलिक यांच्या जावयाच्या घरातून गांजा जप्त करण्यात आला होता. देवेंद्रजी तुमच्या सर्वात जवळचे असलेले वानखेडे (NCB अधिकारी) यांच्याकडून पंचनामा मागा. नवाब मलिक यांच्या जावयाच्या घरातून कोणतीही आक्षेपार्ह वस्तू सापडली नाही, असं त्या पंचनाम्यात लिहिलं आहे”, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक म्हणाले आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी नवाब मलिक यांच्यावर आरोप केले होते. त्यावर आज पत्रकार परिषद घेत मलिक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी मलिक यांच्यावर केला होता. फडणवीस यांच्या आरोपाला उत्तर देताना मलिक म्हणाले आहेत की, ”माझं अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचं कुणीचं सिद्ध करु शकत नाही. तसेच माझे अंडरवर्ल्डशी संबंध होते, तर तुम्ही राज्याचे पाच वर्ष मुख्यमंत्री आणि गृहमंत्री होतात, तेव्हा काय केलं? कारवाई का केली नाही?”, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

यावेळी बोलताना त्यांनी अमृता फडणवीस यांच्या प्रश्नांनाही उत्तर दिले आहे. ते म्हणाले आहेत की, ”काही लोक म्हणत आहेत की मी महिलांपर्यंत पोहचलो आहे. पण मागील 26 दिवसांत प्रकरणाशी संबंधित दोन महिला सोडून मी इतर कोणत्याही महिलांचा उल्लेख केला नाही. किरीट सोमय्यांनी काल अजित पवारांच्या आईचा बहिणीचा उल्लेख केला. यापूर्वी एकनाथ खडसे आणि संजय राऊतांच्या पत्नीबद्दल भाजपाच्या नेत्यांनी विधानं केली, त्याचं काय,”

मलिक पुढे म्हणाले की, ”माझ्या जावयावर फडणवीस यांनी जे आरोप केले आहेत, ते पूर्णपणे चुकीचे आहेत. मी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केला, असा माझ्यावर आरोप करण्यात आला होता, म्हणून मी यापूर्वी माझ्या पदाचा राजीनामा दिला होता. माझ्यावर भ्रष्टाचाराचे कोणतेही आरोप झालेले नाहीत. समीर वानखेडे हे फडणवीस यांच्या जवळचे आहेत. दिवाळीनंतर बॉम्ब फोडण्याची वाट पाहण्याची गरज नाही. फडणवीस सरकारला 1 वर्ष पूर्ण झाल्यावर मी विधान केलं होतं की, मुंबईत कोण तोत्या फडणवीस फिरत आहे.” यावेळी बोलताना मलिक यांनी एनसीबी आधिकारी व्ही. व्ही सिंग यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले आहेत की, जावयाला अटक केल्यानंतर व्ही. व्ही सिंह यांनी लँड क्रूझर या गाडीची मागणी केली होती. व्ही. व्ही. सिंग आणि त्यांचा चालक माने समीर वानखेडे यांच्या प्रायव्हेट आर्मीसोबत लोकांना फसवण्याचा काम करतात.

सत्तर हजार रुपयांचा शर्ट, दोन लाख रुपयांचे बूट घालतात समीर वानखेडे

समीर वानखेडे यांनी मुंबईत आपली प्राव्हेट आर्मी उभी केली आहे. त्यांनी मालदीवमध्ये कोट्यवधी रुपायांची वसूली केली आहे. वानखेडे हे एक लाख रुपायांची पँट घालतात. सत्तर हजार रुपयांचा शर्ट घालतात. दोन लाख रुपयांचे बूट घालतात. त्यांच्या मनगटावर लाखो रुपयांचं घड्याळ आहे. 5-10 कोटींचे कपडे घालून कोण अधिकारी फिरतो का? एखाद्या इमानदार आधिकाऱ्यांकडे इतके पैसे आले कुठून? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.