
लातूरमधील मौजे शिरुर अनंतपाळ येथील घरफोडी करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 1,60,000 रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने लांबवला. या प्रकरणी हनमंत व्यंकट किटेकर (रा. शिरुर अनंतपाळ) यांनी शिरुर अनंतपाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
अज्ञात चोरट्याने तक्रारदारांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश केला. आतील कपाटाचे कुलूप तोडून 70,000 रुपये रोख रक्कम व सोन्याचे मणीमंगळसुत्र असे दोन तोळे सोने (किंमत 90,000 रुपये) असा एकूण 1,60,000 रुपयांचा ऐवज चोरुन नेला. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्वामी करीत आहेत.






























































