लेखी माफी मागा नाही तर पाच कोटी द्या, निलोफर मलिक यांची फडणवीसांना नोटीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘समीर खान यांच्या घरात कुठलीही आक्षेपार्ह वस्तू आढळली नसल्याचे 14 जानेवारी 2021च्या पंचनाम्यात नमूद आहे. असे असताना फडणवीस यांनी आरोप केले. त्यांच्या आरोपांमुळे आम्हाला प्रचंड मानसिक त्रासातून जावं लागत आहे. संपूर्ण कुटुंबाची बदनामी झाली आहे. प्रचंड मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. त्याची भरपाई म्हणून 15 दिवसांच्या आता पाच कोटी रुपये द्यावेत व लेखी माफी मागावी अन्यथा कोर्टात जावं लागेल,’ असा इशारा निलोफर मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.

नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या घरी ड्रग्ज सापडल्याचे वक्तव्य केल्याप्रकरणी मलिक यांची कन्या निलोफर मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. खोटय़ा आरोपांमुळे आयुष्य उद्ध्वस्त होते. एखाद्यावर आरोप करताना आपण काय बोलतो आहोत याचा विचार करायला हवा. फडणवीसांना पाठवलेली ही नोटीस त्याचीच जाणीव करून देण्यासाठी आहे. आता आम्ही मागे हटणार नाही,’ असेही निलोफर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.