सावधान! रिअल टाइम फोटो-व्हिडीओ चोरणारा PhoneSpy आला, अॅप डाऊनलोड करता घ्या काळजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
phone-spy

अँड्रॉइड फोन यूझर्ससाठी एक महत्त्वाची बातमी आहे. अॅप डाऊनलोड करताना तुम्हाला जागरुक राहण्याची आवश्यकता आहे. एक नवा स्पायवेअर आला आहे. हा स्पायवेअर पर्सनल डेटा चोरतो. विशेष म्हणजे हा अॅममधून फोनमध्ये शिरतो. सध्या दक्षिण कोरियात हा स्पायवेअर धुमाकूळ घालत आहे.

हा स्पायवेअर कोणकोणत्या देशात पसरला आहे हे अजून समोर आलेले नाही. त्याविषयी अभ्यास सुरू आहे. PhoneSpy असे या स्पायवेअरला नाव देण्यात आले आहे. अभ्यासकांच्या नुसार फोन वल्नेरेबिलिटीचा गैरफायदा घेत स्पायवेअर फोनच्या कोणत्याही अॅपमध्ये शिरू शकतो.

या संदर्भात मोबाइल सिक्युरिटी फर्म Zimperium ने अहवाल दिला आहे. PhoneSpy आतापर्यंत 23 अॅप्समध्ये आढळला आहे. विशेष म्हणजे हे बनावट अॅप्स नाहीत हा स्पायवेअर आयडेंटिटी चोरतोच मात्र त्याहून अधिक नुकसान करू शकतो. अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार PhoneSpy फोनच्या कॅमेऱ्याचा अॅक्सेस मिळवून यूझर्सच्या नकळत रियल टाइम फोटो आणि व्हिडीओ देखील चोरतो.

या फोटो व्हिडीओच्या मदतीने एकद्या सामन्य व्यक्तीला किंवा सेलिब्रिटी, उद्योगपती यांना ब्लॅकमेल करू शकतो. यूझर्सच्या नकळत हा डेटा चोरत असल्याने हा स्पायवेअर भयानक मानला जातो. त्यामुळे PhoneSpy इंफेक्टेड अॅप डाऊनलोड झाले असल्यास मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

हे अॅप्स अनेक परमिशन मागतात. परमिशन मिळाल्यानंतर PhoneSpy फोनच्या मेन्यूमध्ये इंस्टॉल होऊन लपून राहतो. आणि डेटा गोळा करतो. अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार प्लेस्टोअरवर असे कोणतेही अॅप अद्याप आलेले नाही.

PhoneSpy वेब-ट्रॅफिक रिडायरेक्शन किंवा सोशल इंजिनिअरिंग यांच्या माध्यमातून पसरतो. या स्पायवेअरला ट्रॅक करणे अत्यंत कठीण आहे. त्यामुळे थर्ड पाटी अॅप डाऊनलोड करण्यापासून स्वत:रोखा.