
Redmi Note 11T 5G लवकरच हिंदुस्थानात लॉन्च होणार आहे. कंपनीने याची लॉन्चिंग देत जाहीर केली आहे. हिंदुस्थानात हा फोन 30 नोव्हेंबर रोजी लॉन्च होणार आहे, अशी माहिती कंपनीने दिली आहे. हा फोन Redmi Note 10T चा पुढील व्हर्जन आहे. Redmi Note 10T 5G स्मार्टफोन या वर्षाच्या सुरुवातीला लॉन्च करण्यात आला होता. आज आपण कंपनीच्या या नवीन अपकमिंग फोनबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
Redmi Note 11T 5G मध्ये नावाप्रमाणेच 5G सपोर्ट मिळणार आहे, तसेच यात फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि रॅम बुस्टर फीचर मिळणार आहे. कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, हा स्मार्टफोन सिल्व्हर आणि ग्रीन अशा दोन रंग पर्यायसह लॉन्च करण्यात येणार आहे.
Redmi Note 11T 5G मध्ये MediaTek Dimensity 810 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. हा फोन दोन रॅम पर्याय 6GB आणि 8GB सह येऊ शकतो. याचा बेस मॉडेलमध्ये 64GB स्टोरेज दिले जाऊ शकते. तसेच याचा 128GB स्टोरेज मॉडेलही उपलब्ध असेल. 91Mobiles च्या रिपोर्टनुसार, यात 90Hz रिफ्रेश रेटसह 6.6-इंचाचा फुल-एचडी + डिस्प्ले दिला जाऊ शकतो.
या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली जाऊ शकते. जी 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल. तसेच यात 50 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा दिला जाऊ शकतो. तसेच सेल्फीसाठी यात 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. मनीकंट्रोलच्या रिपोर्टनुसार, याच्या बेस व्हेरिएंटची किंमत 17,999 रुपयांपासून सुरू होऊ शकते. तसेच याच्या टॉप मॉडेलची किंमत 19,999 रुपये असू शकते.


























































