Child Pornography प्रकरणी CBI चे छापे, जमावाची अधिकाऱ्य़ांना मारहाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सीबीआयने चाईल्ड पोन्रोग्राफी 14 राज्यात 77 ठिकाणी छापे मारले आहेत. परंतु ओडिशामध्ये छापेमारीदरम्यान काही अधिकाऱ्य़ांना स्थानिक जमवाने मारहाण केली आहे. स्थानिक पोलिसांनी हस्तक्षेप करत या अधिकाऱ्य़ांची सुटका केली आहे.


सीबीआयची एक टीम ओडिशाच्या ढेकनाल भागात ऑनलाईन चाईल्ड पोर्नोग्राफीविरोधात कारवाईसाठी पोहोचली होती. तेव्हा टीमने सकाळी 7 च्या सुमारास सुरेंद्र नायक या आरोपीच्या घरात छापा मारला. दुपारपर्यंत या आरोपीची चौकशी सुरू होती. तेव्हा स्थानिक जमावाने या टीमवर हल्ला केला.

अनेक महिलांनी लाकडी दांड्याने अधिकाऱ्य़ांना मारहाण केली. जमवाने आधी आरोपी सुरेंद्र नायकला बाहेर काढले, त्यानंतर अधिकाऱ्य़ांना मारहाण केली. तेव्हा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि सीबीआयच्या अधिकाऱ्य़ांना तिथून सुखरूप बाहेर काढले.