
खेड तालुक्यातील ज्या ग्रामपंचायतींमध्ये काही जागा रिक्त राहिल्या आहेत त्या जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात येणार असून या पोटनिवडणुकीच्या प्रक्रिया आजपासून सुरु झाली आहे. तालुक्यातील एकूण 26 ग्रामपंचायतींमध्ये ही पोटनिवडणूक होणार असून यासाठी आदर्श आचारसहिंता लागू करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीचा पंचवार्षिक निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यातील 187 ग्रामपंचायतीच्या 275 जागा रिक्त राहिल्या असून या जागांसाठी ही पोटनिवडणूक होत आहे.
खेड तालुक्यातील बहिरवली ग्रामपंचायतीत नागरिकांचा मागास प्रवर्ग 1, चौगुले मोहल्ला नागरिकांचा मागास प्रवर्ग 1, व नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री 1 , रजवेल सर्वसाधारण स्त्री 1 व नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री 1. सवणस बुद्रुक अनुसूचित जाती स्त्री 1 व नागरिकांचा मागास प्रवर्ग 1, सवणस सर्व साधारण स्त्री 1, खोपी नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री 1, खोपी नागरिकांचा मागास प्रवर्ग 1 स्त्री 1, वावेतर्फे नातू नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री 1, कळंबणी खुर्द, नागरिकांचा मागास प्रवर्ग 1 स्त्री 1 व अनुसूचित जमाती 1, हुंबरी अनुसूचित जमाती 1. नांदिवली नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री 1, अंजनी सर्वसाधारण 1. तळवटपाल नागरिकांचा मागास प्रवर्ग 1 स्त्री 1, सर्वसाधारण स्त्री 1, अनुसूचित जती 1, व अनुसूचित जमाती स्त्री 1, वावेतर्फे खेड नागरिकांचा मागास प्रवर्ग 1 स्त्री 1, धामनंद अनुसूचित जमाती 1, अनुसूचित जाती 1, साखर नागरिकांचा मागास प्रवर्ग 1 स्त्री, 1, सापिर्ली नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री 1, सोनगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग 1 1, मुरडे सर्वसाधारण स्त्री 1, कर्जी सर्वसाधारण 1, नागरिकांचा मागास प्रवर्ग 1 व नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री 1, तुंबाड नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री 1, पन्हाळजे सर्वसाधारण स्त्री 3, नागरिकांचा मागास प्रवर्ग 1 व सर्वसाधारण 1 , मेटे नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री 1, कवळे सर्वसाधारण स्त्री 1, कर्टेल नागरिकांचा मागास प्रवर्ग 1 व नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री 1, चिंचघर सर्वसाधारण 1 व घाणेखुंट सर्वसाधारण स्त्री 1 या जागांसाठी पोटनिवणूक होत आहे.
पोटनिवडणुकीची अधिसूचना 22 नोव्हेंबर रोजी जाहीर झाली असून 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत आहे. दिनांक 9 डिसेंबर रोजी सायंकाळी 3 वाजेपर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यावर उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वाटप केले जाणार आहे.
21 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या दरम्यान आवश्यक त्या ठिकाणी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडेल, 22 डिसेंबर रोजी मतमोजणी करून लगेचच निकाल जाहीर केला जाईल.
संपूर्ण राज्यात 4 हजार 554 ग्रामपंचायतींच्या 7 हजार 130 रिक्त जागा असून रत्नागिरी जिल्ह्यात 187 ग्रामपंचायतीच्या 275 जागा रिक्त आहे. या जागांसाठी जाहीर झालेल्या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता जाहीर झाली असून ज्या ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणूक होणार आहेत त्या ग्रामपंचायतीमध्ये राजकीय घडामोडीना वेग आला आहे.

























































