लोकलचे फर्स्ट क्लासचे तिकीट स्वस्त होणार, लवकरच निर्णय होण्याची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एकीकडे एसी लोकलचे भाडे कमी करण्याची मागणी होत असतानाच साध्या लोकलच्या फर्स्ट क्लासचे तिकीट दर कमी करण्याची तयारी होत आहे. याबाबतचा प्रस्ताव पाठवला असून डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये याबाबतचा निर्णय रेल्वे बोर्ड घेणार असल्याची माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या सूत्रांनी दिली आहे.

जादा भाडे असल्याने एसी लोकल रिकाम्या धावत असल्याने त्यांचे भाडे कमी करण्याच्या प्रस्तावावर विचार सुरू आहे. एसी लोकलच्या सेवेबाबत रेल्वे प्रवाशांचे सर्वेक्षणही करण्यात आले आहे. यातही एसी लोकलचे भाडे कमी करण्याची मागणी प्रवाशांनी केली होती. हा अहवाल रेल्वे बोर्डाकडे विचाराधीन आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी अलीकडेच मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱयांची बैठक घेतली होती. या बैठकीत मुंबईल 238 एसी लोकल देण्यात येणार असून त्यांचे पंत्राट खासगी पंपन्यांना देण्यात येणार आहे. या एसी लोकलचे भाडे एमएमआरडीएच्या मेट्रोच्या भाडय़ाप्रमाणे असावे अशी सूचना यावेळी पुढे आली होती. यावेळी एसी लोकल व लोकलच्या फर्स्ट क्लासचे भाडे दराचे सुसूत्रीकरण करण्यात यावे अशी चर्चा झाली होती.

साध्या लोकलच्या प्रथम श्रेणीच्या सिंगल आणि रिटर्न तिकिटाचे दर कमी करण्याचा प्रस्ताव असून डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये यावर निर्णय होणार आहे. फर्स्ट क्लासच्या मासिक पासाच्या दरात मात्र कोणताही बदल होण्याची शक्यता नसल्याचे म्हटले जात आहे.

ई-तिकिटाला पहिल्या दिवशी थंडा प्रतिसाद

लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना बुधवारपासून यूटीएस मोबाईल अॅपवरून ई-तिकीट आणि पास मिळण्यास प्रारंभ झाला असला तरी पहिल्याच दिवशी यास थंडा प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्या दिवशी मध्य रेल्वेवर सायंकाळी 6 वाजेपर्यंत 3,509 प्रवासी तिकिटे तर 1,034 रेल्वे पासची विक्री झाली तर पश्चिम रेल्वेवर सायंकाळी 5 वाजेपर्यंत 2,807 प्रवासी तिकिटे तर 972 रेल्वे पासची विक्री झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना युनिव्हर्सल पास दाखवताच तिकीट आणि पास विकत घेऊन प्रवास करता येत आहे. मात्र यूटीएस मोबाईल अॅपवरून ई-तिकीट खरेदी करता येत नव्हते. त्यामुळे तिकीट खिडक्यांवरील गर्दी टाळण्यासाठी यूटीएस अॅपवरून तिकीट काढण्याची परवानगी मिळावी अशी मागणी होत होती. राज्य सरकारच्या युनिव्हर्सल पास पोर्टलशी यूटीएस मोबाईल अॅप संलग्न करण्यात आल्याने आज (बुधवार)पासून ई-तिकीट व पासची सुविधा लसीचे दोन्ही डोस घेऊन 14 दिवस पूर्ण झालेल्यांना मोबाईल अॅपवरून मिळत आहे. आज पहिलाच दिवस असल्याने अजून प्रवाशांनी मोबाईलवर यूटीएस अॅप अपडेट केले नसावे. उद्यापासून हळूहळू मोबाईलवरून तिकीट काढणाऱयांची संख्या वाढेल असे सूत्रांनी सांगितले.

फर्स्ट क्लासच्या सिंगल जर्नी तिकिटाचे दर कमी केल्यास फर्स्ट क्लासमधील गर्दी वाढण्याची शक्यता असल्याचे प्रवासी संघटनांचे म्हणणे आहे. मध्य आणि विशेषतः पश्चिम रेल्वेवर पिकअवरमध्ये फर्स्ट क्लासमध्येही प्रचंड गर्दी होत असते. त्यामुळे या निर्णयाने फर्स्ट क्लासमधली गर्दी वाढेल असे प्रवासी संघटनांनी म्हटले आहे.