
झी मराठीवर रात्रीस खेळ चाले ही मालिका प्रेक्षकांना फार आवडली आहे. म्हणून निर्मात्यांनी त्याचे तीन पर्व प्रेक्षकांसाठी आणले होते. त्यापैकी शेवंता या व्यक्तीरेखेने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. अपूर्वा नेमळेकर या अभिनेत्रीने शेवंताची भूमिकेला राम राम केल्याने प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. आता खुद्द अपूर्वाने ही मालिका का सोडली याबाबत मौन सोडले आहे.
View this post on Instagram
अपूर्वाने इन्स्टावर पोस्ट लिहून म्हटले आहे की प्रेक्षकांना शेवंता खूप आवडली परंतु शेवंता साकारणे आपल्या सोपे नव्हते. त्यासाठी आपल्याला 10 किलो वजन वाढवावे लागले होते. त्यानंतर अपूर्वाला अनेकांनी तिच्या वाढलेल्या वजनावर निगेटिव्ह कमेंट्स ऐकाव्या लागल्या होत्या. मालिकेच्या सेटवरील फक्त ज्येष्ठ कलाकारच नाही तर नवख्या कलाकारांनीही अपूर्वाची खिल्ली उडवली. त्यामुळे अपूर्वा नाराज होती. त्यानंतरही अपूर्वाने आपले काम सुरूच ठेवले.
View this post on Instagram
रात्रीस खेळ चाले या मालिकेचे शूटिंग रत्नागिरीच्या सावंतवाडीत सुरू आहे. अपूर्वा 12 तास प्रवास करून सावंतवाडीत पोहोचते परंतु केवळ एकच दिवस तिचे शूटिंग केले जाते. आपला अमूल्य वेळ वाया घालवला जात असल्याचे अपूर्वाने म्हटले आहे.
View this post on Instagram
वाहिनीने दुसरी मालिका देण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासनही वाहिनीने न पाळल्याने आपले आर्थिक नुकसान झाल्याचे अपूर्वाने आपल्या इन्स्टा पोस्टमध्ये म्हटले आहे. झी युवा वरील तुझं माझ जमतंय या मालिकेचा शेवटचा चेक न मिळाल्याचेही अपूर्वाने नमूद केले आहे.
ज्या ठिकाणी आपल्या कष्टाचा योग्य मोबदला मिळत नाही, जिथे आपल्या कामाची अवहेलना होते अशा ठिकाणी काम करणे आपल्या तत्वात बसत नसल्याचे अपूर्वाने म्हटले आहे. तसेच शेवंता या व्यक्तीरेखेबद्दल आपल्या विशेष जिव्हाळा आहे, तरीही हा कठोर निर्णय आपल्याला घ्यावा लागत असल्याचे अपूर्वाने म्हटले आहे. पुढील काळात अजून चांगला अभिनय आपल्या हातून होईल अशी आशाही अपूर्वाने व्यक्त केली आहे.





























































