Delete Message चा वेळ वाढणार, WhatsApp मध्ये येणार हे पाच नवीन फीचर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

WhatsApp हे सध्याच्या घडीला सर्वाधिक लोकप्रिय चॅटिंग ऍप आहे. WhatsApp न वापरणारा व्यक्ती निराळाच. आता WhatsApp वर नवीन अपडेट येणार आहे त्यामुळे युजरला WhatsApp वापरणे अजून सुलभ होणार आहे.

ऑडियो प्लेबॅक स्पीड कंट्रोल

WhatsApp लवकरच ऑडियो प्लेबॅक स्पीड कंट्रोल फीचर देणार आहे. त्यानुसार कोणी जर WhatsApp वर ऑडियो फाईल पाठवली तरी तरी ती कमी स्पीडमध्ये ऐकता येणार आहे.

लास्ट सीन आणि डीपी प्रायव्हसी सेटिंग

सध्या WhatsApp युजर आपल्या स्टोरीज हाईड करू शकतात. WhatsApp एका अशा फीचरवर काम करत आहे त्यावर युजरला आपले डीपी आणि लास्ट सीनही हाईड करता येणर आहे.

फोटो एडिटर

WhatsApp फोटो एडिट ऍप आणण्याच्या विचारात आहे. कंपनी याची लवकरच अधिकृत घोषणा करणार असून WhatsApp Web साठी फोटो एडिटर टूल आणण्यासाठी काम करत आहे.

स्टिकर मेकर

WhatsApp web साठी कंपनीने स्टिकर मेकर टूल आणले होते. आता WhatsApp साठीही कंपनी वेगळी स्टिकर मेकर ऍप आणणार आहे. सध्या WhatsApp वर स्टिकर पाठवण्यासाठी दुसर्‍या ऍपचा वापर करावा लागतो.

WhatsApp डीलीट मेसेज

WhatsApp वर डीलीट मेसेज हा फार महत्त्वाचे फीचर आहे. अनेकवेळा आपण चुकीच्या ग्रुपवर मेसेज करतो. या फीचरमुळे चुकीचे मेसेज डीलीट करण्याची मुभा मिळाली आहे. सध्या युजर मेसेज पाठवल्याच्या एक तास 8 मिनिट आणि 16 सेकंदाच्या आत मेसेज डीलीट करू शकतो. WhatsApp लवकरच हे फीचर अपडेट करणार असून ही वेळ वाढवून सात दिवसांवर करणार आहे.