सत्तेसाठी नव्हे तर सेवेसाठी पंतप्रधानपदी, मोदींनी केली मन की बात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मी आजही सत्तेत नाही तर भविष्यातही सत्तेत नसणार, मी सेवेसाठी पंतप्रधानपदी आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. मन की बात या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी कोरोना गेलेला नाही त्यामुळे काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.

पंतप्रधान मोदी राजेश कुमार प्रजापती यांच्याशी बोलत होते. प्रजापति यांच्या सरकारी  योजनेतून उपचार झाले. म्हणून प्रजापति यांनी सरकारचे आभार मानले तसेच मोदी यांनी असेच सत्तेत रहावे अशा शुभेच्छा दिल्या. तेव्हा पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी आजही सत्ते नाही आणि भविष्यातही सत्तेत नसणार. मी पंतप्रधानपदी फक्त सेवेसाठी आहे. मला जनतेची सेवा करायची आहे असे मोदी म्हणाले.

कोरोना अजून गेलेला नाही

2021 हे वर्ष संपत आहे. नव्या वर्षात जर तुम्ही काही करणार असाल तर नक्की कळवा असे मोदी म्हणाले. तसेच अजूनही कोरोनाचे संकट संपलेले नाही. नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.