
पायधुनी येथे घरातच बनावट नोटा छापणाऱ्या शब्बीर कुरेशी याने सहकाऱ्यांच्या मदतीने बनावट नोटा चलनात आणल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. तपासात शब्बीरच्या संपका&त काही परदेशातील लोक संपका&त होते हेदेखील समोर आल्याचे पोलीस सूत्रांकडून समजते. शब्बीरच्या पोलीस कोठडीत आज दोन दिवसांची वाढ करण्यात आली.
पायधुनीच्या नारायण ध्रुव स्ट्रीटवर असलेल्या करिम मंजील इमारतीच्या सहाव्या मजल्यावर कुरेशीने घरातच बनावट नोटा बनविण्याचा कारखाना थाटला होता. गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकाला याबाबतची माहिती मिळताच प्रभारी निरीक्षक मिलिंद काटे यांच्यासह पथकाने कुरेशीच्या घरावर छाटा टाकला. त्यावेळी घरात दोन हजारच्या एकाच सीरिजच्या 53 नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. एक लाख सहा हजार इतकी त्याची किंमत आहे. कुरेशी याने याआधी काही सहकाऱ्यांच्या मदतीने बनावट नोटा चलनातदेखील आणल्या होत्या. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. कुरेशी याला यापूर्वी अमली पदार्थविरोधी पथक तसेच अजमेर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. परदेशातील लोकांच्या संपका&त राहून कुरेशी बनावट नोटा बनवायचे काम करत होता असे समजते.

























































