9 वर्षांच्या मुलीवर बलात्कार, पाळीव कुत्र्याला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका 9 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप एका कुत्र्यावर ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी या कुत्र्याला अटक केली असून त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे.

ही घटना अमेरिकेतील आहे. अमेरिकेत राहणाऱ्या एका महिलेने तिच्या 9 वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली. पोलिसांनी तिला संशयित व्यक्तिबाबत विचारणा केली.

तेव्हा तिने तिचा संशय तिच्या पाळीव कुत्र्यावर असल्याचं सांगितलं. ही घटना घडली तेव्हा पीडितेसोबत तिचा पाळीव कुत्रा असल्याचं ती वारंवार सांगत राहिली. तिच्या तक्रारीमुळे पोलिसांनी आणि संबंधित प्राणी विभागाने या कुत्र्याला अटक केली. या कुत्र्याची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली.

मात्र, पोलिसांना या महिलेच्या जबाबावर संशय होता. या महिलेचा दुसरा विवाह झाला असून तिच्या नवऱ्यानेच सावत्र मुलीवर बलात्कार केला असावा आणि त्याला वाचवण्यासाठीच ही महिला कुत्र्यावर आरोप करत असल्याचा पोलिसांचा संशय होता.

त्यानुसार त्यांनी महिलेच्या नवऱ्याला ताब्यात घेण्यात आलं असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. दुसरीकडे, महिलेच्या मानसिक परिस्थितीवरही पोलिसांना संशय असून तिच्या मानसिक स्थितीबाबत माहिती मिळवण्यात येत आहे.