रितेशला आता दिग्दर्शनाचे ‘वेड’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तब्बल 20 वर्षे अभिनयाची कारकीर्द गाजवल्यानंतर अभिनेता रितेश देशमुख आता आगामी ‘वेड’ या मराठी चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करतोय. विशेष म्हणजे त्याची पत्नी, अभिनेत्री जेनेलिया देशमुख या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.

चित्रपटाचे पोस्टर शेअर करत रितेश म्हणाला, ‘‘साधारण 20 वर्षांपूर्वीची गोष्ट. मी कॅमेऱयासमोर उभा राहिलो होतो तेव्हा मनात भीती, उत्सुकता, जिद्द होती, पण ते स्वप्न होते. काहींना वाटले की, हा वेडेपणा आहे. नंतर सगळ्यांनी आशीर्वाद आणि प्रेम देऊन हे वेड जिवंत ठेवले. 2021 मध्ये मी कॅमेऱयाच्या मागे जाण्याचा वेडेपणा करतोय. मनात तशीच भीती, उत्सुकता आणि जिद्द आहे. पुन्हा आपल्या सगळ्यांचे प्रेम, आशीर्वाद असू द्या.’’ मुंबई फिल्म कंपनी निर्मिती  या चित्रपटात रितेश-जेनेलियासह अभिनेत्री जिया शंकर मुख्य भूमिकेत आहे. 12 ऑगस्ट 2022 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.