
ई-कॉमर्स क्षेत्रातील एक मोठी कंपनी असलेल्या Amazon या कंपनीने आपली एक महत्त्वाची वेबसाईट बंद करण्याची घोषणा केली आहे. ही वेबसाईट गेली 25 वर्षं अॅमेझॉनसोबत काम करत होती.
या वेबसाईटचं नाव Alexa.com असं आहे. गेली 25 वर्षं ही वेबसाईट अॅमेझॉनसाठी रिसर्च आणि अॅनालिसिस टूल पुरवण्याचं काम करते. अॅलेक्साची सेवा थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला असून आता 8 डिसेंबरपासून त्याच्या नवीन सबस्क्रिप्शन प्रक्रियेलाही थांबवण्यात आलं आहे.
अॅमेझॉनने Alexa इंटरनेटला 1996मध्ये लॉन्च केलं होतं. या वेबसाईटच्या माध्यमातून आपल्या वेबसाईटचं रॅकिंग तपासता येऊ शकत होतं. आता ही सेवा थांबवण्याचा निर्णय अॅमेझॉनने घेतला असून त्यामागे नेमकं काय कारण आहे, त्याबाबत स्पष्टता झालेली नाही.


























































