मुस्लिम समाजावर केमोथेरपीची गरज; विहिंपचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवींद्र नारायण सिंह यांचे मत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुसलमानांसाठी मक्का तशी हिंदूंसाठी अयोध्या आहे असे सांगताना फाळणीनंतर हिंदुस्थानात कॅन्सरसारख्या वाढणाऱया मुस्लिम समाजावर केमोथेरपीची गरज आहे, असल्याचे मत विहिंपचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवींद्र नारायण सिंह यांनी येथे माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

देशात मुस्लिम कॅन्सरसारखा वाढत आहे. अशात हिंदू धर्माबाबत पूर्वीपासून असलेली उदासीनता आजही कायम आहे. परिणामी हिंदू कमपुवत झाल्यामुळे या कॅन्सरला रोखायचे असेल तर त्याच्यावर किमोथेरपीची गरज आहे, असे सिंह म्हणाले. हिंदू समाज मजबूत झाला पाहिजे. अन्यथा 50 वर्षानंतर अफगणिस्थानसारखी स्थिती भारतात निर्माण होईल आणि हिंदू समाज संपुष्टात येईल, असे सिंह यांनी स्पष्ट केले.

विश्व हिंदू जनकल्याण परिषदेच्या विदर्भ प्रांत कार्यालयाचे भूमिपूजन विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्यश्री डॉ. रवींद्र नारायण सिंह यांच्या उपस्थित करण्यात आले. त्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. आचार्य जितेंद्रनाथ महाराज, प्रांत अध्यक्ष राजेश्वर निवल, महानगर अध्यक्ष सुदर्शन शेंडे, केंद्रीय मंत्री प्रशांत हरताळकर आदी उपस्थित होते.

स्वातंत्र्यानंतर हिंदू धर्माप्रती सरकारची उदासीनता लपून राहिलेली नाही. हिंदूंच्या समस्यांकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे हा समाज कमकुवत झाला आहे. आता नव्या पिढीला यासाठी मोठय़ा प्रमाणात काम करण्याची गरज आहे. धर्माच्या आधारावर देशाचे विभाजन झाल्यानंतर ’अतिथी देवो भव’ संस्कृतीमुळे मुस्लिम समाजाला सांभाळले. पण हा कॅन्सर देशभर पसरला आहे.

आगामी पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये विहिंप हिंदुत्व हाच मुद्दा लावून धरणार आहे. आम्ही राजकारणात हस्तक्षेप करीत नाही. पण, हिंदु हिताची दक्षता घेणे आमचे काम असून ते आम्ही करतच राहू, असे सिंह म्हणाले. श्रीनगरमध्ये होत असलेल्या टारगेट किलिंगचा सामना करण्यासाठी विहिंप सक्षम आहे. तेथील दहशतवाद्यांनी अंतिम लढाई सुरू केली आहे. पण, त्यांच्याशी कसे लढायचे हे आम्हाला माहिती आहे, असे सिंह म्हणाले.