ऐश्वर्याला ईडीचे बोलावणे, दिल्ली कार्यालयात चौकशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पनामा पेपर्सप्रकरणी अभिनेत्री ऐश्वर्या राय हिची आज सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सुमारे सात तास चौकशी केली. दिल्लीतील लोकनायक भवनातील ईडीच्या कार्यालयात ऐश्वर्याला चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. सायंकाळी साडेसातपर्यंत तिची चौकशी सुरू होती.

ब्रिटनमधील पनामा येथील एका लॉ फर्ममधून करांसंदर्भातील सव्वा कोटी कागदपत्रे उघड झाली होती. जगातील बडय़ा नेत्यांची आणि सेलिब्रिटींनी कोटय़वधी रुपयांचा कर बुडवल्यासंदर्भातील ती गोपनीय कागदपत्रे होती. हिंदुस्थानातील सुमारे 500 व्यक्तींची नावे त्यात होती. त्याचप्रकरणी ऐश्वर्याला ईडीने चौकशीसाठी बोलवले होते. ऐश्वर्याला अमिक पार्टनर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची संचालक बनवण्यात आले होते. त्यानंतर तिला कंपनीची हिस्सेदार बनवण्यात आले. कंपनीमध्ये ऐश्वर्याच्या कुटुंबातील सदस्यही पार्टनर होते. 2005 मध्ये स्थापनेच्या वेळी ही 50 हजार डॉलर्सची कंपनी 2008 मध्ये दीड हजार डॉलर्सना विकण्यात आली.