
देशातील प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्स जानेवारी 2022 मध्ये आपली नवीन हॅचबॅक ‘टियागो’चा सीएनजी व्हेरिएंट लॉन्च करणार आहे. टाटा डिलर्सने याची प्री-बुकिंग देखील सुरू केली आहे. मात्र याबाबत कंपनीने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी लवकरच आपल्या ‘टाटा पंच’चा सीएनजी व्हेरिएंटही लवकरच लॉन्च करणार आहे. कंपनी याच्या सीएनजी मॉडेलवर काम करत आहेत. सध्या बाजारात टाटा पंचचा पेट्रोल व्हेरिएंट विक्रीसाठी उपलब्ध आहे. याचे पेट्रोल इंजिन 85 बीपीएच पॉवर वर 113 एनएम टॉर्क जनरेट करते. कंपनीने टाटा पंच सीएनजीची चाचणी सुरू केली आहे. कंपनीची ही नवीन कार 2022 मध्ये नेमक्या कोणत्या महिन्यात लॉन्च होणार, हे अद्याप सांगता येणार नाही.
टाटा पंच सीएनजीमध्ये (Tata Punch CNG) कंपनी 1.2 लिटर 3-सिलेंडर रेव्होट्रॉन इंजिन देऊ शकते. ज्यामुळे पॉवर आणि टॉर्कमध्ये काही प्रमाणात कमतरता पाहायला मिळू शकते. ही लहान एसयूव्ही 70-75 बीपीएच ची पॉवर आणि 100 एनएम टॉर्क जनरेट करेल. कंपनी ही कार फक्त मॅन्युअल प्रकारात लॉन्च करू शकते. तसेच ही कार प्रति लिटर 30 किमीचा मायलेज देऊ शकते. याच्या डिझाइनमध्ये मोठा बदल पाहायला मिळू शकतो. कंपनी फेंडर आणि मागील बाजूस CNG बॅज देईल. हिंदुस्थानात याची स्पर्धा Hyundai Santro, Maruti WagonR आणि अपकमिंग Swift CNG शी होईल.
फीचर्स
पंचच्या बेस व्हेरियंटमध्ये ड्युअल एअरबॅग्ज, EBD सह ABS, टिल्ट-अॅडजस्टेबल स्टीयरिंग, सेंट्रल लॉकिंग, फ्रंट पॉवर विंडो आणि 15-इंच स्टील व्हील सारखे फीचर्स मिळू शकतात. तसेच मिड-व्हेरियंटमध्ये 4-इंचाचा डिस्प्ले आणि 4 स्पीकर, मल्टी-फंक्शनल स्टीयरिंग व्हील, रिमोट की लॉक/अनलॉक, पॉवर्ड ORVM, पॉवर विंडो, फॉलो मी होम हेडलॅम्प, यूएसबी चार्जिंग सॉकेट आणि ऑडिओ सिस्टम सारखे फीचर्स देखील यात देण्यात येऊ शकतात.



























































