बिहारमधील न्यूडल्स फॅक्टरीत बॉयलरचा स्फोट, 6 ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

बिहारमधील मुजफ्फरपूर शहरातील एका न्यूडल्स फॅक्टरीत बॉयलरचा स्फोट झाला असून त्यात 6 जण ठार झाले आहेत. या स्फोटात पाच जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सकाळी साडे नऊच्या सुमारास हा स्फोट झाला. हा स्फोट इतका जबरदस्त होता की फॅक्टरीच्या भिंती कोसळल्या असून पत्रे देखील उडाले आहेत. या कोसळलेल्या भिंतीच्या मलब्याखाली देखील काही कामगार अडकले असल्याची भिती व्यक्त केली जात आहे.